चँपियन्स लीगमध्ये मुंबईची धुरा वाहणार पोलार्ड

keiron-pollard
रायपूर – अष्टपैलू केरन पोलार्ड यांची आगामी चँपियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधार निवड करण्यात आली असून क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे कर्णधारपदी पोलार्डची निवड करण्यता आली आहे.

पोलार्डने २०१३च्या हंगामात २९ षटकार मारले होते. मुंबई इंडियनकडून त्याने ९६ सामन्यांमध्ये १,७०० धावा केल्या आहेत. यात १०० षटकारांचा समावेश आहे. त्याच बरोबर त्याने ६३ गडीही बाद केले आहेत. २०१३च्या अंतिम सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला होता.

चँपियन्स लीगचे माजी विजेते मुंबईला यंदा मुख्य फेरीत पात्र ठरण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. पात्रता फेरीच्या लढती १३ सप्टेंबरपासून होणार आहेत.

Leave a Comment