गुजरातच्या रस्त्यावर अवतरल्या मगरी

crocodile
बडोदा – नदीमध्ये वास्तव्य करणारा मगर हा प्राणी. कधी कधी मगर नदी काठावर आढळते. मात्र मनुष्यवस्तीमध्ये मगरीचे दर्शन अभावानेच घडते. सध्या अशीच अपवादात्मक परिस्थिती गुजरातच्या बडोदा शहराच्या रस्त्यावर निर्माण झाली आहे. नदीमध्ये वास्तव्य करणा-या मगरी सध्या बडोद्याच्या रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत.

बडोद्यातून वाहणा-या विश्वमित्रा नदीला मागच्या काही दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. या पूराचे पाणी शहरातील रस्त्यांवर आले असून, या पाण्याबरोबर नदीतील मगरी रस्त्यावर आल्या आहेत.

काही अतिउत्साही मंडळींनी या मगरींना पुन्हा नदीत पाठवण्याचे प्रयत्न केले. मात्र या मगरींनी आपले शक्तीपरीक्षण दाखवताच या मंडळींना तिथून काढता पाय घ्यावा लागला. सध्या बडोद्यात पाऊस थांबला असून, शहरातील पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे या मगरी पुन्हा पाण्याच्या दिशेने नदीत परततील अशी शक्यता आहे.

Leave a Comment