यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा रद्द

cm
मुंबई- निवड समितीची यावर्षी एकही बैठक न झाल्याने महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा रद्द झाल्यातच जमा असून दरम्यान, सांस्कृतिक विभागातील एका वरिष्ठ अधिका-याने पुरस्कार सोहळा रद्द झाल्याला दुजोरा दिला आहे. दोन-तीन दिवसांत आचारसंहिता लागू होणार असून त्यानंतर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही हे उघड आहे. वारंवार बैठका घेण्याबाबत स्मरणपत्र देऊनही मुख्यमंत्र्यांनी पत्रांना केराची टोपली दाखविल्याने सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे प्रचंड नाराज असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार १९९७ पासून शिवसेना-भाजप युती सरकारने सुरु केला असून पहिला पुरस्कार जेष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. पाच लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे पूर्वी स्वरूप होते. मात्र गेल्या वर्षापासून या पुरस्कार रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून आता पुरस्कारकर्त्यांना दहा लाख रुपये रोख देण्यात येते. महाराष्ट्रात किमान २० वर्षापेक्षा अधिक वास्तव्यास असलेल्या तसेच आपल्या क्षेत्रात वैशिष्ट्पूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो.

Leave a Comment