मोबाईलवर मिळणार लोकलचे तिकीट

mobile-ticket
मुंबई – आता तिकीटांसाठी लोकलने प्रवास करणाऱ्यांना रांगेत ताटकळ उभे राहावे लागणार नाही. कारण आता लोकलच तिकिट मोबाईवरच काढता येणार आहे. यासाठी इंटरनेट असलेल्या स्मार्टफोनची आवश्यकता नाही. साध्या मोबाईल हँडसेटवरुनही तुम्ही लोकलचे तिकीट काढू शकता.

येत्या तीन महिन्यात रेल्वे ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देणार आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करुन प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासन ही हायटेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देणार आहे.

यासाठी App डाऊनलोड करुन मोबाईल नंबर IRCTC आणि बँकेकडे नोंदवावा लागेल. यानंतर प्रवासाचा मार्ग आणि फे-यांची संख्या App वर नोंदवून नेट बँकिंगव्दारे किंवा डेबिट कार्डव्दारे तिकिटाचे पैसे भरावे लागतील.

यानंतर बार कोडचा मेसेज येईल त्याआधारे स्टेशनवरच्या मशिनवर तिकीटाची प्रिंट घेता येणार आहे.

Leave a Comment