मुंबई पोलिसांच्या रडारवर रोड रोमियो

rakesh-maria
मुंबई – सध्या मुंबई पोलिसांच्या रडारवर महिलांशी छेडछाड करणारे ‘रोड रोमियो’ असून गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्या एकूण ७०० जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी छेडछाड विरोधी पथके स्थापन केली होती. या पथकाला गर्दीच्या ठिकाणचे व्हिडिओ शूट करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये महिलाची छेड काढताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.तसेच अमली पदार्थांच्या प्रकरणी ६८८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर, ८०३ लोकांना अटक करण्यात आली आहे.

ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या किंवा वातावरण खराब करणाऱ्या २ हजार ९८३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान महिलांची छेडछाड करणा-यांवर यापुढेही कार्यवाही सुरु राहणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Leave a Comment