बबल फूटबॉल – नवी क्रेझ

football
बबल फूटबॉल या मुळ युरोपिय देशातील खेळाची क्रेझ आता जगभरात वेगाने पसरत चालली असल्याचे दिसून येत असून विविध देशांतून त्यांचे सामनेही भरविले जात आहेत. पर्यायाने हे बबल बनविणार्‍या कंपन्या आणि सामन्यांचे आयोजन करून देणार्‍या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अमेरिकेतील सिअॅटल येथेही नुकतेच या बबल फूटबॉलचे सामने पार पडले.

हा खेळ मुख्यत्वे मजेसाठी खेळला जातो आणि यात खेळणार्‍याची आणि खेळ पाहणार्‍याची खूपच करमणूक होते. प्रेक्षक तर खेळ पाहताना हसून लोटपोट होतात. या खेळात खेळाडू स्वतःभोवती प्रचंड आकाराचा फुगा बांधतात आणि फुटबॉल खेळतात. शरीराभोवतीच्या फुग्यामुळे खेळ खेळणे वाटते तेवढे सोपे जात नाहीच पण खेळाडूंची फजितीच अनेकवेळा होते.

वाढदिवस, कंपनी डे, चॅरिटी अशा उपक्रमांसाठी बबल फुटबॉलचे सामने मुद्दाम आयोजित केले जात आहेत. अर्थात या खेळात कुणीही खेळू शकतो. याच खेळाला बबल सॉसर, बंपर बॉल्स, बॉडी झोबिंग या नावांनीही ओळखले जाते.

Leave a Comment