डायेबटीसचे उच्चाटन करणारे औषध तयार

hibiscus
भारतातील मोठी आरोग्य समस्या बनलेल्या मधुमेहाचे पूर्ण उच्चाटन करू शकेल असे औषध प.बंगालच्या विश्वभारती विश्वविद्यालय आणि आसामच्या तेजपूर विश्वविद्यालयातील संशोधकांनी तयार केले असून त्याच्या उंदरावर घेण्यात आलेल्या चाचण्या अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत.

संशोधक समीर भट्टाचार्य यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार जास्वंद जातीच्या झाडाच्या पानांपासून हे औषध तयार केले गेले आहे. या वनस्पतीला स्थलपद्म या नावानेही ओळखले जाते आणि आयुर्वेदात फार पूर्वीपासून ही वनस्पती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते आहे. सध्या मधुमेह नियंत्रणासाठी जी अॅलोपथी औषधे वापरली जातात ती मुख्यत्वे रक्तशर्करा नियंत्रित करण्याचे काम करतात मात्र त्यामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही. स्थलपद्म वनस्पतीच्या पानांपासून पॉलिफिनोल तत्त्वापासून मिळविलेले फ्लूरेलिक अॅसिड हे नैसर्गिक तत्त्व इन्शुलिन अधिक तयार करण्यास मदत करते असे उंदरांवर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

दोन आठवडे उंदराना हे औषध दिले गेले तेव्हा त्यांच्या इन्शुलिन तयार करण्याच्या वेगात आश्वर्यकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हे औषध आणखी कांही काळ टेस्ट करून मग ते बाजारात आणण्याविषयी परवानगी घेतली जाईल असे सांगितले जात आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण गंभीर असून नवे औषध मधुमेहींसाठी वरदान ठरले असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment