अबब! त्याची जीभ आहे १०.१ सेंटिंमीटरची

longest-toung
वॉशिंग्टन – जगातील सर्वात लांब जीभ असलेला माणूस अशी अमेरिकेच्या २४ वर्षीय निक स्टोएबर्लची गिनिज बुकात नोंद झाली आहे.

निकची जीभ १०.१ सेंटिमीटर इतकी लांब असून सर्वात लांब जीभ असलेल्या निकची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड २०१५ बुकात नोंद करण्यात आली आहे. आपल्या लांब जीभेमुळे निक सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. याआधी हा विक्रम ब्रिटनच्या स्टेफन टेलरच्या नावे होता. त्याची जीभ ९.८ सेंटिंमीटर आहे. मात्र निकने स्टेफनचाही हा विक्रम मोडीत काढला आहे.