वृद्धत्व टाळणार्‍या जनुकाचा शोध

oldage
माणसाला नेहमीच मृत्यू आणि वृद्धत्व कसे टाळता येईल याचे वेध लागलेले असतात. काही तरी करून म्हातारपण टाळावे, त्यासाठी काही औषधे शोधावीत, गोळ्या शोधून काढाव्यात असा त्याचा कायमचा प्रयत्न जारी आहे. आता याच प्रयत्नामध्ये असे एक जनुक सापडले आहे की, जे वृद्धत्वाकडे होणारी वाटचाल काही प्रमाणात रोखू शकते. या जनुकामुळे वृद्धत्व अजिबात टाळता येणार नाही, पण त्याला जर सक्रिय केले तर शरीराच्या निदान काही अवयवात तरी झीज होण्याचा वेग कमी करता येतो, असे दिसायला लागले आहे.

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेल्स्च्या एका विद्यापीठात या संबंधीचे संशोधन मोठ्या वेगाने सुरू आहे. माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये एएमपीके नावाचे एक जनुक असते. ते जेव्हा सक्रिय होते तेव्हा वृद्धत्वाकडील वाटचाल कमी होते. म्हणून त्याला सक्रिय करायला पाहिजे. ते सक्रिय नसल्यामुळे वृद्धत्व येत असते. एका प्रकारच्या माशीच्या जनुकावर संशोधन करताना त्यांना हे जनुक आढळले. हे जनुक म्हणजे ऊर्जेचा सेन्सार आहे.

ते माणसाच्या शरीरात असते, पण ते सक्रिय नसते. माशीच्या शरीरामध्ये त्याला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या अवयवाची झीज काही प्रमाणात मंद झाल्याचे आढळले. असाच प्रयोग माणसात केला तर तो लवकर म्हातारा होणार नाही, असे शास्त्रज्ञांना वाटते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment