लव्ह जिहादला शिवसेनेचे लव्ह त्रिशूलने उत्तर

shivsena
बरेली- उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या घटना प्रकर्षाने सामोर्‍या येत असताना उत्तर प्रदेशातील शिवसेना युनिटने लव्ह जिहादला लव्ह त्रिशूलने उत्तर देण्याची योजना आखली आहे. हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करायचे आणि नंतर त्यांना धर्मांतर करून मुस्लीम बनवायचे याला लव्ह जिहाद असे संबोधले जात आहे. त्याला उत्तर म्हणून लव्ह त्रिशूल योजना आखली गेली असून यात लव्ह जिहादची केस आढळली की शिवसेनेचे कांही गट तेथे हस्तक्षेप करून मध्यस्तीच्या सहाय्याने मुलींची सुटका करणार आहेत.

उत्तर प्रदेश शिवसेना प्रमुख अनिल सिंग म्हणाले की तरूण हिंदू मुलींचे रक्षण करणे, त्यांना धर्मांतरच्या भीतीपासून वाचविणे आणि लव्ह जिहादला फशी पडण्यापासून परावृत्त करणे यासाठी ही योजना सुरू केली असून त्याची सुरवात बरेलीपासून केली गेली आहे. लवकरच सर्व उत्तर प्रदेशात ही चळवळ सुरू केली जात आहे. खेळाडू तारा शहदेव हिच्या लव्ह जिहाद केसमुळे या प्रकाराला वाचा फुटली आहे व त्यानंतर हिंदू संघटनांनी त्याविरोधात बंदही पाळले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू विवाह कार्यक्रम, सण, महाविद्यालयातून लव्ह जिहादची माहिती देणारी पत्रके वाटली असल्याचेही वृत्त आहे. अल कायदाचा म्होरक्या जवाहिरीने अल कायदाची शाखा भारतात सुरू झाल्याचे घोषित केल्यानंतर संघाने अशी पत्रके वाटून हिंदू मुलींमध्ये जागृती करण्याचे काम हाती घेतले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment