भाजप कार्यकर्ते मंदा म्हात्रेंच्या विरोधात आक्रमक

manda-mhatre
नवी मुंबई – नुकत्याच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांना सध्या भाजप पक्षातील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असून मंदाताई म्हात्रे यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मंदा म्हात्रे यांना पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांचा याला विरोध आहे.

नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते मंदाताई विरोधात एकवटले आहेत. मंदा म्हात्रे यांना विधानसभेची उमेदवारी देवू नये अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. भाजपच्या नवी मुंबईतल मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका करत मंदाताई म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. राष्ट्रवादीत आपल्याला अनेक त्रास होत असल्याचे म्हात्रे यांनी राजीनामा देताना म्हटले होते. तसेच गणेश नाईक हे एकाधिकारशाहीने वागत असल्याचा गंभीर आरोपही म्हात्रे यांनी केला होता.

Leave a Comment