अ‍ॅपलने लॉन्च केले ‘आयफोन ६’ सह ‘आयफोन ६ प्लस’ व स्मार्ट घड्याळ

iphone
सॅनफ्रान्सिस्को – अॅपलच्या नव्या आयफोन ६ ची प्रतिक्षा संपली आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा आयफोन ६ चे नुकतेच दमदार लाँचींग झाले आहे. धारधार चाकूनेही आयफोन ६ च्या स्क्रिनला ओरखडे पडणार नाहीत

‘आयफोन ६’ सह ‘आयफोन ६ प्लस’चे अनावरणही मंगळवारी रात्री करण्यात आले. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी एका दिमाखदार सोहळ्यात या दोन्ही फोन्सचे अनावरण केले.

iphone1

आयफोन ६ चा डिस्प्ले हा ४.२ इंचाचा आहे. तर, ६ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंचांचा आहे. या फोनमध्ये अॅपलची नवी आयओएस ८ वापरण्यात आली आहे. आयफोन-६ ची किंमत ४८-५० हजार रुपये तर ‘आयफोन ६+’ ची किंमत ५८-६० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

या दोन्ही फोनचे प्रोसेसर हे आयफोनच्या आत्तापर्यंतच्या मॉडेलमधील प्रोसेसरच्या तुलनेत ५० टक्के अधिक जलद काम करणारे आहेत. ग्राफिक्सचा वेगही ८४ टक्के जास्त आहे. यामुळे आयफोन ६ प्लस हा गेमिंगसाठी उत्तम फोन ठरणार असल्याचे कूक यांनी यावेळी सांगीतले.

हे दोन्ही फोन हे आत्तापर्यंतच्या आयफोनच्या मॉडेल्सच्या तुलनेत कमी जाडीचे आहेत. यामुळे ते हाताळण्यासही सोपे ठरणार आहेत. अ‍ॅपल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही फोन १७ ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात उपलब्ध होतील.

iphone2

अॅपलने सादर केले स्मार्ट घड्याळ
तीन मॉडेल्स अॅपल वॉच, अॅपल वॉच स्पोर्ट, अॅपल वॉच एडिशन
अॅपल वॉच एक क्रांतिकारी घड्याळ जे अनेक अर्थांनी बदल घडवेल. ह्या घड्याळाच्या सहाय्याने फोन कॉल, मेसेज, गाणी ऐकणे, मॅप पाहणे, फिटनेस ट्रॅक, हेल्थ ट्रॅक, ट्वीटर सारखे ऑनलाइन सोशल नेट अॅप्स, इतर अनेक फीचर्स सोबत अॅपलच स्मार्टवॉच मार्केटमध्ये दणक्यात पदार्पण. ह्या घड्याळाची किंमत ३४९$ (जवळपास २१००० रुपये) पासून सुरू होते.

Leave a Comment