पुणे – बजाज ऑटोने त्यांची ऑस्ट्रेलियन भागीदार कंपनी केटीएमच्या सहयोगाने दोन सुपर स्पोर्टस बाईक आरसी ३९० व आरसी २०० बाजारात आणल्या आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे २ लाख ५ हजार व १ लाख ६० हजार रूपये अशा आहेत. बजाजचे उपाध्यक्ष अमित नंदी यांनी ही माहिती दिली.
बजाजच्या दोन सुपर स्पोर्ट बाईक सादर
नंदी म्हणाले की या दोन नव्या आर सी सिरीज सुपरबाईक्समुळे केटीएमचा भारतातील व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षात केटीएमने त्यांच्या व्यवसायात १२० टक्के वाढ नोंदविली आहे. या दोन्ही बाईकचे बुकींग आजपासून देशभरातील १४० वितरकांकडे करता येणार आहे. आरसी ३९० ला ३७३ सीसीचे इंजिन दिले गेले आहे तर आरसी २०० ला २०० सीसीचे इंजिन दिले गेले आहे.