दुर्मिळ २३२ कॅरेटचा हिरा आढळला दक्षिण आफ्रिकेत

diamond
प्रिटोरिया : पेट्रा कंपनीच्या वतीने अत्यंत दुर्मिळ असा २३२ कॅरेटचा हिरा दक्षिण आफ्रिकेतल्या प्रसिध्द कुल्लीनन खाणीतून आढळला असल्याची माहिती देण्यात आला आहे.

कोणताही विशिष्ट आकार नसलेला हा हिरा अतिशय चकचकीत आहे. दर्जा आणि गुणवत्तेच हे सर्वात उत्तम उदाहरण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या हि-याची किंमत १६ मिलियन अमेरिकन डॉलर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेर या हिऱयाची विक्री होण्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

Leave a Comment