अखेर ठाणे महापालिकेवर फडकला भगवा

thane
ठाणे – ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरे यांची वर्णी लागली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा मोरे यांनी २० मतांनी पराभव केला. संजय मोरेंना ६६ मते मिळाली तर विक्रांत चव्हाण यांना ४६ मते मिळाली आहेत.

महापौरपदाच्या मतदानावेळी मनसे तटस्थ भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेच्या संजय मोरे यांच्या विजय निश्चित झाला.

नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या रविंद्र फाटक यांनी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा चांगलाच फायदा सेनेला महापौरपदाच्या निवडणुकीत झाला आहे. मोरे हे ठाणे महानगर पालीकेचे २१ वे महापौर झाले आहेत.

उपमहापौर पदी सेनेचे राजेंद्र साप्ते यांची वर्णी लागली आहे. साप्ते यांना ६६ मतं मिळाली. काँग्रेसच्या मेघना हंडोरे यांना ४९ मतं मिळाली.

Leave a Comment