शिवसेनेची उत्तर भारतीयांशी लाडीगोडी

shivsena
मुंबई – लोकसभेत शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान करणारे उत्तर भारतीय विधानसभा निवडणुकांतही आपल्या बाजूचेच रहावेत यासाठी शिवसेनेने विशेष प्रयत्न सुरु केले असून या उत्तर भारतीयांशी संपर्क साधण्यासाठी कांही निवडक हिंदी भाषिक नेत्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेत्यांवर हिंदी भाषिकांना एकत्र आणण्याची जबाबदारी सोपविली गेली आहे.

मुंबईत आजपर्यंत उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार होते.मात्र मोदी लाटेचा परिणाम येथेही जाणवला आणि या नागरिकांनी भाजप व सेनेला मोठ्या प्रमाणावर मते दिली. त्यामुळे शिवसेनेचा उत्साह वाढला आहे. विद्यार्थी सेना कोअर कमिटीचे सदस्य राजेश दुबे म्हणाले की आम्ही मतदारसंघनिहाय हिंदी भाषिकांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यात त्यांच्या अडचणी आणि सेनेविषयीच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. १-२ मतदारसंघातून हिंदी भाषिकांनी विधानसभेसाठी उमेदवारीही मागितली आहे, त्याचा निर्णय लौकरच घेतला जाईल,

युवा मंचाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे हिंदीचे शिक्षक विनय शुक्ला यांना हिंदी भाषिक समन्वयक म्हणून नेमले गेले असून ते ठाणे व मुंबईत हिंदी भाषिकांशी संपर्क साधण्याचे काम करत आहेत. हिंदी भाषिकांना सेनेने उमेदवारी दिली तर ते सेनेसाठी फायद्याचे ठरेल असेही मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment