दिल्लीकर घरखर्चात आघाडीवर

delhi
दिल्ली- देशभरातील जनता महागाईचे चटके सोसत असताना देशातील कांही शहरातील नागरिक खर्च करण्याच्या बाबतीत अजिबात हयगय करत नसल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दिल्ली सरकारनेच हा अहवाल तयार केला होता. त्यानुसार दिल्लीकर मासिक ३८४२ रूपये प्रतिव्यक्ती खर्च करतात असे आढळून आले आहे. हरियानातील कांही शहरात हे प्रमाण ३८१७ रूपये, गुजराथेत २५८१, केरळ ३४०८, पंजाब २७९४ तर उत्तर प्रदेशात हेच प्रमाण २०५१ रूपये असे आहे.

दिल्लीकर त्यांच्या एकूण खर्चापैकी ३९ टक्के खर्च खाण्यापिण्यावर करतात व ६१ टक्के खर्च अन्य कारणांसाठी करतात. खाण्यापिण्याच्या खर्चातही ११ टक्के खर्च दूध व दुग्धजन्य पदार्थ यांवर तर ६ टक्के खर्च खाद्यान्नावर केला जातो. देशभरात शहरी भागात हेच प्रमाण ४१ टक्के आहे. खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त खर्चात सरासरी ६ टक्के खर्च वीज आणि इंधन यावर, ६ टक्के कपडे, ८ टक्के शिक्षण, ६ टक्के घरभाडे तर १ टक्का पान तंबाखूवर केला जातो असेही दिसून आले आहे. विशेष म्हणजे यात नियमित पगारी नागरिकांचे प्रमाण ५६ टक्के आहे, ३५ टक्के व्यावसायिक आहेत तर ५ टक्के श्रमिक आहेत.

Leave a Comment