गुगलचा अँड्राईड वन आज सादर होणार

macromax
मायक्रोमॅक्स गुगल अँड्राईड वन स्मार्टफोन आज ८ सप्टेंबर ला लाँच केला जात आहे. गुगलने या स्मार्टफोनची घोषणा जूनमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या कंपनीच्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये केली होती. त्यावेळी हार्डवेअर पार्टनर मायक्रोमॅक्स लावा आणि स्पाईस च्या सहकार्याने अँड्राईड वन हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

आज सादर होत असलेल्या या स्मार्टफोनसाठी १५ सप्टेंबरपासून प्री ऑर्डर बुकींग सुरू होईल असे सांगितले जात आहे. या फोनसाठी ४.५ इंचाचा स्क्रीन, ड्युअल सिम , एफ एम रेडिओ असे फिचर्स आहेत. त्याला लेदर स्टीच बॅक कव्हरही दिले गेले आहे. कंपनीने ५ अब्ज ग्राहकांचे टार्गेट नजरेसमोर ठेवले असून प्रामुख्याने विकसनशील देशांच्या बाजारपेठांवर कंपनी लक्ष केंद्रीत करणार आहे.