व्यायामाला वय नाही

excer
व्यायाम हा तरुण लोकांनी करायचा असतो. एकदा पन्नाशी ओलांडली की पुन्हा व्यायाम करण्याची काही गरज नाही असा सर्वसाधारण समज आहे. पण तज्ज्ञांना तसे वाटत नाही. पन्नाशी नंतर सुद्धा व्यायाम केला पाहिजे, किंबहुना पन्नाशीनंतर व्यायाम केला तरच माणूस छान तंदुरुस्त राहू शकतो. म्हणून वयाचा बहाणा न सांगता व्यायाम केला पाहिजे. जे लोक तरुपणापासून व्यायाम करत आलेले आहेत त्यांनी पन्नाशीनंतरही तो चालू ठेवावा, एवढेच नव्हे तर जन्मभर कधीही व्यायाम न केलेल्या व्यक्तीने पन्नाशीच काय, पण त्यानंतरच्या कोणत्याही वयात नव्याने व्यायाम सुरू केला तरी चालतो.

वृद्धावस्थेत किंवा उतरत्या वयात सुद्धा शरीर प्रकृती छान ठेवायची असेल तर व्यायाम करायला हवा. व्यायामामुळे वृद्धावस्थेत होऊ पाहणारे कंपवात किंवा निद्रानाश, कर्करोग, लठ्ठपणा, हृदयविकार असे बरेच आजार टळतात. काही विकार हे विशिष्ट जीवनशैलीमुळे होत असतात. मात्र व्यायाम सुरू असेल तर मधुमेह, रक्तदाब असे जीवन शैलीशी संबंधित विकार सुद्धा टळतात. उतारवयात खालील प्रकारचे व्यायाम केले पाहिजे.

चालणे – या वयातला उत्तम व्यायाम म्हणजे चालणे. भरभर चालण्याने रक्त प्रवाह वेगवान होतो आणि फुफ्फुसे बळकट होतात. दररोज किमान ३० मिनिटे चालले पाहिजे. त्यामुळे चरबी कमी होते, सांध्यांचे विकार टळतात आणि एनर्जी लेवल वाढते. पोहोण्याची सोय उपलब्ध होत असल्यास पोहायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे शरीराची, हाडांची आणि सांध्यांची लवचिकता वाढते.

योगासने – योगासने हा तर मोठाच शास्त्रशुद्ध व्यायाम आहे आणि त्याच्यामुळे शरीरात ताण निर्माण होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते. मन प्रफुल्लित राहून अन्न चांगले पचन होते. गुडघे आणि हातांचे सांधे मजबूत राहतात. घरगुती कामे हा सुद्धा एक चांगला व्यायामच आहे. घरातील भांडी घासणे, धुणे धुवणे यामुळे शरीराला हालचाली मिळतात आणि वजन कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही