बंगलोरची माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपनी विप्रोने इनोव्हेशन क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने आपल्या बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूदही केली असल्याचे समजते. कंपनीचे सीटीओ (चीफ टेक्नीकल ऑफिसर) के.आर. राजीव यांनी ही माहिती दिली.
विप्रो करणार रोबोटिक्समध्ये गुंतवणूक
ते म्हणाले की आजयर्पंत भारतीय कंपन्या व्यवसाय चालवा,व्यवसाय बदला याच पद्धतीने व्यवसाय करत आहेत. मात्र इनोव्हेशनकडे फारसे लक्ष दिले जात नाही. भविष्यकाळ हा नवीन कल्पनांचा म्हणजेच इनोव्हेशनचा आहे. त्यामुळे आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मॅन मशीन सहकार्य, रोबोटिक्स, स्मार्ट डिव्हायसेस यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. यातून कंपनीला येत्या पाच वर्षात महसूलाचे चांगले साधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी सुरवातीला कंपनीने १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात या साठी कंपनी नवीन कंपनी स्थापन करणार नाही अथवा सध्याच्या कंपनीत वेगळा विभागही स्थापन करणार नाही तर या क्षेत्रात नव्यानेच सुरू होत असलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक करणार आहे. विप्रो स्वतःची लॅब काढणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.