वाटली डाळ

vatli-dal
साहित्य- हरबरा डाळ, हिरवी मिरची, जिरे, गूळ, ओले खोबरे, लिंबू, कढिलिंब, चवीनुसार मीठ
कृती- हरबर्‍याची डाळ निवडून तीन ते चार तास भिजवावी. चांगली भिजल्यानंतर मिक्सरमधून जरा जाडसर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात हिरवी मिरची आणि थोडे जिरे घालावेत. वाटलेला गोळा काढून त्यात चवीनुसार मीठ, चवीनुसार गुळ, थोडे जिरे घालून एकत्र कालवावे.

जरा जास्त तेलाची फोडणी करावी. त्यात हिंग, कढिलिंब टाकावा आणि त्यात वाटलेली डाळ घालावी. मंद आचेवर दोन तीन वाफा द्याव्यात. डाळ मोकळी होऊ लागली की गॅस बंद करावा. नंतर या तयार डाळीवर लिंबू पिळावे आणि खायला देताना ओले खोबरे आणि कोथिंबिर घालून द्यावे. गुळाऐवजी यात साखर घातली तरी चालते. मात्र गूळ घातलेली डाळ जास्त खमंग लागते.

दुसर्‍या प्रकारात वाटलेल्या डाळीत मीठ, साखर, मिरची घालून ही डाळ कुकरमध्ये उकडून काढली जाते. गार झाल्यावर हाताने फोडून मोकळी केली जाते आणि वरून फोडणी दिली जाते. ही डाळही चवीला चांगली लागते.

Leave a Comment