दहीपोहे

dahi-pohe
गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीसोबत दही पोहे न्याहरी म्हणून देण्याची प्रथा महाराष्ट्रासह अन्य राज्यातही पाळली जाते. गणेश मूर्ती स्थापन केल्यानंतर कुठे दीड दिवसांत, कुठे सातवे दिवशी, कुठे गौरींबरोबर, कुठे अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जन कधीही केले तरी गणपतीसोबत दही पोहे दिले जातात तसेच वाटली डाळ प्रसाद म्हणून वाटली जाते.

दही पोहे
आज कालच्या इंन्स्टंट फूडचा एक प्रकार म्हणूनही दही पोहे करता येतील. त्याची कृती आणि साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य- जाड पोहे १ वाटी, गोड दही १ वाटी, हिरवी मिरची, कढिलिंब, कोथिंबिर, मीठ,साखर, फोडणीचे साहित्य
कृती- पोहे स्वच्छ निवडून पाण्याने धुवून निथळावेत. पोहे भिजले की त्यात दही, मीठ, साखर घालावी. एकत्र कालवावे. त्यानंतर तेलाची फोडणी करावी. फोडणीत जिरे, मोहरी, कढिलिबाची पाने, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि हिंग घालावा. फोडणी चांगली तडतडली पाहिजे. नंतर पोहे दूध घालून थोडे सरसरीत करावेत आणि वरून ही तयार केलेली फोडणी गार झाल्यावर घालून पुन्हा एकत्र कालवावेत.

आवडीप्रमाणे यात दाणे, डाळे,काकडीचे तुकडे, डाळिबाचे दाणेही घालता येतात. झटपट होणारा हा पदार्थ अतिशय चवदार लागतो. कुठे फोडणीत हिरव्या मिरचीऐवजी कुटाची मिरची अथवा सुकी लाल मिरचीही घातली जाते. खायला देताना कोथिंबिर घालून द्यावे.

Leave a Comment