‘फ्युचर ग्रुप’ ऑनलाइन रिटेल क्षेत्रात दाखल

future
नवी दिल्ली – ‘फ्युचर ग्रुप’ने ऑनलाइन रिटेल क्षेत्रात कडवी स्पर्धा देण्यासाठी ‘ओमनी कॉमर्स’ची सुरूवात केली आहे. याच्या माध्यमातून कंपनी सर्व प्रकारातील प्रॉडक्टची ऑनलाइन विक्री करणार आहे. यासाठी फ्युचर ग्रुप ‘हायब्रिस’ बरोबर १८ महिन्यात १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

फ्युचर ग्रुप ‘ओमनी कॉमर्स’च्या माध्यमातून काम करणार आहे. ‘हायब्रिस’ बरोबरील हातमिळवणी ही कंपनीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या करारानुसार डिजिटल आणि फिजिकल रिटेलिंग एकाच क्षेत्रात येतील. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ हे सर्व ओमनी कॉमर्स मिळणार आहेत. ऑनलाइन क्षेत्रात दाखल झाल्यावर फ्युचर ग्रुपच्या विक्रीत ८ ते १० टक्के वाढ सहज शक्य आहे. ऑनलाइन रिटेल क्षेत्रात स्पर्धा नसल्याचे कंपनीचे सीईओ किशोर बियाणी यांनी सांगितले.

Leave a Comment