पाकिस्तानात पावसाने घेतला १६० जणांचा बळी

rain1
इस्लामाबाद – गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात पडत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत १६० जणांचा बळी घेतले आहेत तर १४८ लोक जखमी झाले आहे.

बुधवारपासून सुरु झालेल्या या पावसाने अद्यापही विश्रांती न घेतल्यायामुळे देशातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असून या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत देशातील १६० लोकांचे बळी गेले आहे.

पावसाचा मोठा फटका पंजाब, पाकिस्तानव्याप्त काश्मीर, आणि गिलगित-बालिस्तान या भागांना बसला असून लाहोर आणि रावळपिंडीमध्येही हीच परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत पलांदरी येथे ६६८ मिमी, इस्लामाबाद शहरात ३१६ मिमी, रावळपिंडी शहरात ४४० मिमी, लाहोरमध्ये ३५० मिमी आणि सियालकोटमध्ये ३१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी याबाबत शनिवारी बैठक घेतली. यामध्ये मुसळधार पावसामुळे देशात उद्भवलेली पूरसदृश्य परिस्थिती तसेच यामुळे झालेले नुकसान याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद सईद अलीम यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात सुरु असलेल्या बचावकार्यांची माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान शरीफ यांनी तातडीने लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे तसेच मध्यरात्रीपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुले करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

याआधी २०१० मध्ये पाकिस्तानात आलेल्या पुरामध्ये एक हजार ७०० लोकांचा मृत्यू झाला होता तर २१ दशलक्ष लोकांना याचा फटका बसला होता. तर २०१३ मध्ये आलेल्या पुरात १७८ लोकांचा बळी गेला होता तर १.५ दशलक्ष लोकांना या पुराचा फटका बसला होता.

Leave a Comment