मायक्रोसॉफ्टने आणले तीन नवीन स्मार्टफोन

lumia
जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीने गुरूवारी तीन नवीन ल्युमिया स्मार्टफोन सादर केले आहेत. पैकी एक सेल्फी प्रेमींची खास आवड लक्षात घेऊन बनविला गेला आहे. मायक्रोसॉफटने ल्युमिया ८३०, ल्युमिया ७३५ व ल्युमिया ७३० असे स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे २९१९०, १७३७०,१५८०० रूपये अशा आहेत. या महिन्यातच हे फोन जगभरात विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. याचबरोबरच कंपनीने ल्युमिया डेनिम नावाचे खास सॉफटवेअरही सादर केले असून ते केवळ विंडोज आठ ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या ल्युमिया फोनसाठीच वापरता येणार आहे.

ल्युमिया ८३० साठी विंडोज फोन ८.१, ल्युमिया डेनिम ओएस, ५ इंची डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, १० एमपी कॅमेरा आणि रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे तर ल्युमिया ७३५ व ७३० साठी ४.७ इंची डिस्प्ले, ६.७ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या तिन्हीही फोनसाठी स्कायपे, मायक्रोसॉफट ऑफिस आणि वन ड्राईव्हही उपलब्ध केले गेले आहे.

Leave a Comment