भारत आत्महत्यांमध्ये आघाडीवर

sucied
जागतिक आरोग्य संघटनेला प्राप्त झालेल्या २०१२ या वर्षातील आत्महत्यांच्या आकड्यांवरून याबाबत भारत देश सर्वात आघाडीवर असल्याचे आढळले. भारतात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एकंदर जगातच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत असतो असे या अहवालावरून दिसून येत आहे.

आत्महत्या करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये आणि वृद्धांमध्ये अधिक असल्याचे आकड्यांवरून दिसते. २०१२ साली भारतात २ लाख ५८ हजार लोकांनी आत्महत्या केल्या. त्यातील १ लाख आत्महत्या महिलांच्या होत्या तर १ लाख ५८ हजार आत्महत्या पुरुषांच्या होत्या. दर एक लाखामागे २१.१ असे भारतातले आत्महत्यांचे प्रमाण आहे. भारताच्या खालोखाल गयाना आणि कोरिया या देशांमध्ये देखील आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे.

श्रीलंका, लिथवानिया, सुरीनाम, मोझांबिक, नेपाळ, टांझानिया, बुरुंडी आणि दक्षिण सुदान हेही देश आत्महत्यांच्या बाबतीत पुढे आहेत. या देशातील आत्महत्या करणार्‍या लोकांत ७५ टक्के लोक गरीब वर्गातले असतात असेही आकडेवारीवरून दिसून येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment