टोनी अॅबॉट यांनी घेतली मास्टर ब्लास्टरची भेट

sachin
मुंबई : ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मुंबईत येऊन खास भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची भेट घेतली असून ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच या महान खेळाडूला पाठिंबा मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियन दूतावासाने एका खास कार्यक्रमाचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रेट ली आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्या उपस्थितीत आयोजन केले होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आले आहेत. यानिमित्त दूतावासाने ‘क्रिकेट डिप्लोमसी’ अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमानंतर लगेचच आयोजित पत्रकार परिषदेत सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या भेटीवेळच्या आठवणींना उजाळा दिला.

ब्रॅडमन यांनी तेंडुलकर याला त्यांच्या संघात स्थान दिले होते, ही आपल्यासाठी कायमस्वरूपी अमूल्य भेट असल्याचेही सचिनने यावेळी सांगितले. तेंडुलकर म्हणाला, सर ब्रॅडमन यांनी १९९४-९५मध्ये त्यांच्या पत्नीजवळ म्हटले होते की, त्यांची आणि माझी खेळण्याची शैली एकसारखीच आहे. त्यांच्यासारख्या महान खेळाडूने केलेली स्तुती ही माझ्यासाठी अमूल्य भेट आहे. त्याचबरोबर मला त्यांनी आपल्या संघात स्थान देणे ही त्याहून मोठी गोष्ट होती.

Leave a Comment