सॅमसंग गॅलॅक्सी नोट ४ लाँच

samsung2
कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंगने त्यांच्या नवीन गॅलेक्सी नोट ४ चे बिजिंग, न्यूयार्क आणि बर्लिन येथे एकाच वेळी लाँचिंग केले असून हा कार्यक्रम इंटरनेटवर लाइव्ह दाखविला गेला. गॅलेक्सी नोट ४ पांढरा, काळा, सोनेरी आणि गुलाबी अशा चार रंगात सादर करण्यात आला आहे. याचवेळी गॅलेक्सी नोट एज, गिअर एस स्मार्टवॉच, गिअर व्हीआर ही लाँच करण्यात आले असून त्यातील गॅलेक्सी गिअर व्हीआर गॅलेक्सी नोट ४ सह वापरता येणार आहे.

अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, नवीन डिझाईन, चांगला एस पेन अनुभव ही या नोट ४ ची खास वैशिष्ट्ये सांगितली जात आहेत. नोट चार फ्लॅट डिझाईनमध्ये असून त्याला २.५ डी ग्लास फोन प्रोटेक्शन स्वरूपात दिली गेली आहे. या मुळे स्क्रॅचेस येण्यास प्रतिबंध होणार आहे. मेटॅलिक फ्रेम, १७६ ग्रॅम वजन, ८.५ मिमी जाडी, १६ एमपी कॅमेरा, ३.७ चा फ्रंट कॅमेरा या नोटसाठी देण्यात आला आहे. शिवाय मागील बाजूस शटर बटण देण्यात आले आहे. यामुळे सिंगल क्लिक फोटो काढता येणार आहेत तसेच वाईल्ड सेल्फी मोड मध्येही फोटो काढणे शक्य होणार आहे.

Leave a Comment