राज्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे निधन

fajal
मुंबई : बुधवारी रात्री उशिरा प्रसिद्द अर्थतज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे वयाच्या ९३ वर्षी अलाहाबाद येथे निधन झाले.

भारतातील आघाडीचे अर्थतज्ञ म्हणून ‘लंडन स्कूल इकॉनॉमिक्स’मधून पदवी घेतलेल्या मोहम्मद फजल यांची ख्याती होती. भारतीय नियोजन आयोगाचे ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे पाहिले जात होते. मोहम्मद फजल यांनी १९९९ ते २००२ या कार्यकाळात गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला होता. त्यानंतर ऑक्टोबर २००२ ते डिसेंबर २००४ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद भुषविले होते.

फजल यांची सर्वप्रथम १९७७ मध्ये औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते १९८० ते ८५ या काळात नियोजन आयोगाचे सदस्य होते.

Leave a Comment