
मुंबई : राज्यात आज सात दिवसांचे गणपती बाप्पा आज पुन्हा आपल्या घरी परतणार असून बाप्पांसोबतच माहेरवाशीण गौरीलाही आज निरोप दिला जाणार आहे.
राज्यभरात आज गौरी-गणपतींचे विसर्जन
मागील सात दिवस सकाळी-संध्याकाळ बाप्पांची होणारी पूजाअर्चा, नैवेद्याची तयारी, घराघरातून उमटणारा टाळ आणि झांजांचा आवाज आज एकदम कमी होईल.
दरवर्षीच अत्यंत भावपूर्ण रितीने आज बाप्पांना निरोप देण्यात येतो. ‘गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, अशा आरोळ्या सगळीकडे पाहायला मिळतील.


