भारताला ऑस्ट्रेलियाकडून मिळणार युरेनियम ?

tony-abotta
मुंबई – दोन दिवसाच्या भारत दौ-यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट आले असून नागरी अणूऊर्जा करारासह क्रीडा क्षेत्राशी संबंधित महत्वाच करार या दौ-यात होण्याची शक्यता आहे. अबॉट गुरुवारी सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले.

नागरी अणूऊर्जा करार अबॉट यांच्या दौ-यात भारतासाठी महत्वाचा असून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकमत झाले तर, ऑस्ट्रेलियाकडून भारताला अणूऊर्जा निर्मितीसाठी लागणारे युरेनियम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

अणवस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिल्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियातील तत्कालीन लेबर पक्षाच्या सरकारने युरेनियम विकण्याचा निर्णय रद्द केला होता. मुंबईमध्ये अबॉट उद्योगपती आणि निवडक कंपन्यांच्या सीईओंबरोबर चर्चा करणार आहेत.

Leave a Comment