आशियातील सर्वाधिक स्वच्छ गांव मावल्यान्नाँग

meghalay
भारताचे मेघालय राज्य मुळातच निसर्गसौंदर्याची जणू खाण आहे. हे राज्य आणखी एका गोष्टीसाठीही प्रसिद्ध आहे. ती म्हणजे या राज्यातील मावल्यान्नाँग हे गांव आशियातील सर्वाधिक स्वच्छ गांव म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले आहे. आशियातील स्वच्छ गांव तसेच भारतातील सर्वात स्वच्छ गाव असे पुरस्कार या छोट्याशा गावाने मिळविले आहेत.

या गावाची आणखीही कांही वैशिष्य्ये आहेत. हे गांव १०० टक्के साक्षर आहे. या गावात फक्त ९५ कुटुंबे राहतात आणि त्यातील बहुसंख्य फक्त इंग्रजी भाषाच जाणतात आणि बोलतात. पर्यटकांसाठीही हे गांव म्हणजे निसर्गसौदर्यांची पर्वणी देणारे आहे. अनेक सुंदर धबधबे, विपुल वनश्री, दाट जंगले, झाडांच्या मुळांपासून बनलेले नैसर्गिक पूल, बॅलेन्सिंग रॉक्स आणि त्याहूनही सुंदर म्हणजे येथील अगत्य पर्यटकांना भुरळ घालते.

मेघालयातील शिलाँगपासून आणि भारत बांग्ला सीमेपासून ९० किमी अंतरावर हे गांव आहे. येथे सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. गावातील कचरा, पालापाचोळा साठवून त्यापासून खत तयार केले जाते आणि त्याचा वापर करून सुपारीच्या बागा फुलविल्या जातात. देवाचे उद्यान अशीही या गावाची ख्याती आहे. या गावावर एक डॉक्युमेंटरीही बनविली गेली आहे.

Leave a Comment