
वॉशिंग्टन – औद्योगिक रसायनशास्त्रात अमेरिकन केमिकल सोसायटीचा प्रतिष्ठित एसीएस पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञ डॉ. थॉमस जॉन कोलाकट यांना प्राप्त झाला असून हा पुरस्कार या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार गणला जातो.
अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञाला
औद्योगिक रसायनशास्त्रात हा पुरस्कार प्राप्त करणारे केरळमधील चंगनाचेरीच्या सेंट बर्कमॅन्स कॉलेज आणि आयआयटी चेन्नई येथून शिक्षण पूर्ण करणारे डॉ. कोलाकट पहिलेच भारतीय ठरले असून डॉ. कोलाकट यांनी एमबीएची पदवीही प्राप्त केली आहे. तसेच रॉयल सोसायटी ऑफ केमेस्ट्रीचे ते फेलोही होते. या पुरस्काराचे प्रायोजक व्यापार विकास आणि व्यवस्थापनाचा एसीएस विभाग आणि औद्योगिक आणि इंजिनीअरिंग रसायनशास्त्राचा एसीएस विभाग आहे. रासायनिक क्षेत्रातील कंपनी जॉनसन मॅथी येथे कार्यरत असलेले डॉ. कोलाकोट अमेरिका, ब्रिटन आणि भारतीय प्रयोगशाळेतील संशोधनाचे निर्देशन करतात.
