अमित शहांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

amit-shah2
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चारच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.

amit-shah3

अमित शहा यांचे आज सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शहा म्हणाले, विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणेच कार्यकर्त्यांनी जोमाने व जल्लोषाने काम करावे. महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता नक्की घालवू, असेही शहा यांनी सांगितले.

त्यानंतर, अमित शहांनी विनोद तावडेंच्या निवासस्थानी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर तावडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहांनी उद्धव ठाकरेंचे निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले. याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे अमित शहा दर्शन घेणार असल्याचे तावडेंनी सांगितले.

Leave a Comment