मोडकसागर धरणात होणार ‘लेक टॅपिंग’!

modak-sagar
मुंबई : आज मोडकसागरमध्ये मुंबई महानगर पालिका लेक टॅपिंग करणार असून या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळे पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणे शक्य होणार आहे. या लेक टॅपिंगसाठी महापालिका तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पाऊस महिनाभर लांबला तरी लेक टॅपिंगमुळे मुंबईत पाणीकपात करण्याची वेळ भासणार नाही तसेच मुंबईची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून जादा पाणीपुरवठा करणेही शक्य होईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. यापूर्वी राज्य सरकारने कोयना धरणात अशा प्रकारचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला होता.

Leave a Comment