मुंबईची लाईफलाईन पुन्हा विस्कळीत

local
मुंबई – मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या मध्यरेल्वे मार्गावरुन प्रवास करणा-या चाकरमान्यांच्या मागे विघ्नांचा सुळसुळाट संपत नाही तोच सलग दुस-या दिवशी मरे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वे रुळाला दिवा-मुंब्रा मार्गा दरम्यान तडे गेल्यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवली आहे. मुंबईकडे सीएसटीच्या दिशेने येणा-या गाडया वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे रुळाला त़डे गेल्याचे लक्षात आले.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सलग दुस-या दिवशी हा प्रकार घडल्याने कामावर येणा-या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी सकाळी मुलुंड-घाटकोपर दरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड़ वायर तुटल्याने वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे सर्व गाडया अर्धा ते पाऊणतास उशिराने धावत होत्या.

Leave a Comment