फेसबुकवर झळकले लाचखोरांचे फोटो

lach
पुणे – सरकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकार्‍यामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फेसबुकच्या स्वतंत्र पेजवर अशा लाचखोरांचे फोटो प्रसिद्ध करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच १६०० पेक्षा अधिक नागरिकांना या पेजला भेट दिली असल्याचे दिसून आले आहे.

या विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले की आम्ही सर्वसामान्य नागरिकांना लाचखोर कर्मचारी, अधिकारी यांची माहिती व्हावी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी मदत व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. अशा लाचखोरांचे फोटो फेसबुकवर देताना त्यांनी किती लाच खाल्ली त्याचा तपशील आणि त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालाची कॉपी ही माहितीही दिली गेली आहे. या वर्षात आत्तापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७४४ छापे टाकून १००९ अधिकारी कर्मचार्‍याना अटक केली आहे.

Leave a Comment