डान्स बारवरील बंदी कायम

dance-bar
मुंबई : राज्य शासनाने हॉटेल, परमिट रूम तसेच बीअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला असून यात पंचतारांकित हॉटेल्सचाही समावेश असून, यापूर्वी दिलेले नृत्याविष्काराचे सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

केवळ बीअर बारच नव्हे तर हॉटेल, परमिट रूमही आता बंदीच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी आणली, मात्र पंचतारांकित हॉटेलांमध्ये ते सुरूच असल्याने त्यांना विशेष सूट कशासाठी, असा सवाल केला जात होता.

या ठिकाणी नृत्याविष्कार आयोजित करणा-या, आयोजित करण्याची व्यवस्था करणा-या, आयोजित करण्यास परवानगी देणा-या कोणत्याही व्यक्तीस तीन वर्षापर्यंत कारावास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल. नृत्याविष्कार सुरूच असल्याचे आढळल्यास हॉटेल, परमिट रूम किंवा बीअर बारचे परवाने रद्द करण्यात येतील. मात्र त्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची संधी परवानाधारकाला दिली जाणार आहे.

Leave a Comment