चिदंबरमचे नटराज मंदिर

chidambar
भारतात सर्वाधिक पूजला जाणारा देव म्हणजे देवांचा देव महादेव. अर्थात महादेव, शंकराची असंख्य मंदिरे भारतात जागोजागी असली तरी या मंदिरात महादेवाची मूर्ती पाहायला मिळत नाही तर लिंगस्वरपातच महादेवाचे दर्शन भाविकांना होत असते. तमीळनाडूतील चिदंबरम मंदिर मात्र याला अपवाद असून येथे मानवी रूपातील नटराज या नृत्यदेवतेच्या स्वरूपात महादेवाचे दर्शन घेता येते.

दक्षिणेकडील सर्वच मंदिरे अति भव्य आणि उंचच उंच गोपुरांनी नटलेली आहेत. चिदंबरमचे नटराज मंदिरही याला अपवाद नाही. पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारी म्हणून जी पाच महादेव मंदिरे ओळखली जातात त्यात या मंदिराचा समावेश होतो. नटराज मंदिर पंचमहाभूतातील आकाशाचे प्रतिक मानले जाते. आंध्रातील कालहस्ती हे वायूचे , थिरूवनाइर्कवल येथील जम्बुकेश्वर जलाचे, कांचीचे एकांबरेश्वर पृथ्वी तत्त्वाचे तर थिरूवन्नामलाई अरूणाचलेश्वर हे अग्नी तत्त्वाचे प्रतीक मानले जाते.

नटराज मंदिर सुमारे ५० एकराच्या परिसरात असून द्रविड वास्तकलेचा अप्रतिम नमुना मानले जाते. विशाल घुमट, उंच गोपुरे असलेल्या या मंदिरातील नटराज मूर्ती सालंकृत आहे. भरत नाट्यम या नृत्यात नटराज ही नृत्याची देवता म्हणून पुजली जाते. हे स्थान चेन्नईपासून २३५ किमी दूर आहे तर पुद्दुचेरीपासून ते केवळ ७८ किमीवर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे, रस्ता आणि विमान सेवा उपलब्ध आहे. या मंदिराला एकदा तरी भेट द्यायला हवीच.

Leave a Comment