उडणारा आणि पक्ष्यांना पळविणारा रोबो

pakshi
लंडन- नेदरलँडमधील डिझायनर निको मिजोलहुडस यांनी खर्‍या पक्ष्यांप्रमाणे उडू शकणारा आणि त्रासदायक पक्ष्यांना पळवून लावणारा रोबो तयार केला असून त्याला रोबो बर्ड असे नांव दिले आहे. क्लियर फ्लाईट सोल्युशन्स कंपनीत निको काम करतात.

या रोबो विषयी माहिती देताना ते म्हणाले की पक्षी निष्पाप आणि कितीही सुंदर असले तरी कांही क्षेत्रात त्यांचा उपद्रव होतो. विमानोड्डाण तसेच शेती आणि कचरा प्रतिबंध याकामी पक्षी त्रासदायक ठरतात. विमानांसाठी तर ते भयंकर धोकादायक असतात कारण अनेकवेळा पक्षी धडकल्याने विमाने कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे जेथे पक्ष्यांचा उपद्रव नको असेल तेथे रोबो बर्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हा रोबो खर्‍या पक्ष्याप्रमाणे दिसतो. तो उडू शकतो तसेच उपद्रवी पक्ष्यांचा पाठलाग करून त्याला पळवून लावू शकतो. तो रिमोट कंट्रोलने नियंत्रित करता येतो. इतकेच नव्हे तर पक्षी उपद्रव असलेल्या जागांचे संकेतही तो देऊ शकतो. ५८ सेंमी लांबीच्या या रोबोचे पंख १२० सेंमी लांबीचे आहेत. गरूडासारख्या मॉडेलमधील रोबो बर्ड २२० सेंमी पंखांचा असून तो दिसायलाच भयंकर दिसतो त्यामुळे पक्षी त्याच्याजवळ फिरकत नाहीत. हा पक्षी पंखांची उघडझापही खर्‍या पक्ष्यांप्रमाणेच करतो.

Leave a Comment