आता विमलकुमार साईना नेहवालचे प्रशिक्षक

saina
आशियाई गेम्स अगदी दाराशी येऊन ठेपल्या असताना भारताची फुलराणी साईना नेहवाल हिने तिचे आत्तापर्यंतचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याऐवजी विमलकुमार यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ती बंगलोरला जाणार आहे. डेन्मार्कमध्ये झालेल्या वर्ल्डकप चॅपियनशिप स्पर्धांनंतरच साईनाने तिचा हा निर्णय प्रशिक्षक गोपीचंद यांना कळविला होता असेही समजते.

साईना आणि गोपीचंद यांची जोडी भारताच्या बॅडमिटन इतिहासातील सर्वात यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते. २४ वर्षीय साईनाला गेले काही दिवस तिचा फॉर्म सापडत नाहीये. त्यामुळे प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय तिने घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विमलकुमार याच्याकडे तिचे प्रशिक्षण १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रशिक्षक बदलण्याची साईनाची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वी साईनाने २०११ साली गोपीचंद यांच्याऐवजी भास्करबाबू यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. मात्र लवकरच तिला तिची चूक कळून आल्यानंतर तिने पुन्हा गोपीचंद यांच्याकडेच खेळणे पसंत केले. त्यानंतरच तिने लंडन ऑलिंपिक्समध्ये ब्रॉन्झ पदकाची कमाई केली होती.

Leave a Comment