‘अजिंक्य’च्या शतकामुळे टीम इंडियाने सर केले यशाचे ‘शिखर’

team-india
बर्मिगहॅम – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने एकदिवसीय सामन्यात आम्हीच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले असून इंग्लंडविरुद्धची चौथी वनडे ९ विकेटनी आरामात जिंकत पाहुण्यांनी मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारतासाठी २०७ धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हतेच. मात्र पाहुणा किती लवकर जिंकतो, याची उत्सुकता होती. फॉर्मात असलेला सलामीवीर अजिंक्य रहाणेने (१००) दमदार शतक ठोकताना विजयाची मजबूत पायाभरणी केली. ९४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची दिमाखदार खेळी करताना शिखर धवनसह विक्रमी १८३ धावांची सलामी दिली. अजिंक्यचे हे पहिलेच वनडे शतक आहे. इंग्लंड दौ-यात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या धवनलाही सूर गवसला. त्याने ८१ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली. अजिंक्य आणि शिखरच्या झंझावातामुळे भारताने प्रतिस्पध्र्याचे आव्हान ३०.३ षटकांत पार केले.

तत्पूर्वी, भारताचे गोलंदाज पुन्हा एकदा सरस ठरले. मध्यमगती मोहम्मद शामीसह (३ विकेट), भुवनेश्वर कुमार आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (प्रत्येकी) प्रभावी मा-यामुळे पाहुण्यांनी इंग्लंडला ४९.३ षटकांत २०६ धावांत रोखले.

Leave a Comment