शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची निर्घुण हत्या

murder
नांदेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर महादेव ठाणेकर यांची अहमदनगर-बीड मार्गावर लूटीनंतर हत्या करण्यात आली आहे.

मुंबईहून नांदेडला परतत असताना जामखेडपासून सात किमी अंतरावर रात्री एकच्या सुमारास मुहा परिसरात दरोडेखोर गाडी लुटण्यासाठी आले आणि त्याचवेळी शंकर ठाणेकर यांची हत्या केली.

चार ते पाच जणांनी शंकर ठाणे यांची कार लूटली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे मुखेड तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment