जगातला सर्वात स्लीमेस्ट जिओनी एलाईटचे फोटो लिक

gioni
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी जिओनी ने जगातील सर्वात स्लिमेस्ट स्मार्टफोन तयार केला असून या स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर लिक झाले आहेत. वर्ल्डस स्लीमेस्ट फोन या टॅगलाईनखाली हा फोन बाजारात आणला जाणार असून जिओनी एलाईट एस ५.१ असे त्याचे नामकरणही केले गेले आहे.

प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून जिओनी एलाईटची जाडी केवळ ५ मिमि इतकी आहे. ४.८ इंचाचा स्क्रीन, १६ जीबी इंटरनल मेमरी, टूजी, थ्रीजी, फोरजी कनेक्टीव्हीटी, ४.३ अँड्राईड शिवाय एमिगो २.० युजर इंटरफेस अशी त्याची अन्य वैशिष्टये आहेत. हा फोन बाजारात कधी सादर केला जाणार ती तारीख अद्यापी कंपनीने जाहीर केलेली नाही.