मोदी सरकारवर चव्हाणांनी केला हल्लाबोल

chavhan
मुंबई – केंद्रातील मोदी सरकारवर प्रदेश काँग्रेसने आज एक पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठविली असून यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकार कसे अपयशी ठरले हे सांगत काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.

यावर मुख्यमंत्री म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये एकाधिकारशाहीने कारभार केला असून त्याचप्रमाणे ते केंद्रात कारभार करत आहेत. सार्वजनिक पैशाचा मोदी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अपव्यय करत आहेत. ज्या राज्यांकडे अधिक वीज आहे, त्यांची वीज इतर राज्यांना पुरवणे केंद्राचे काम आहे. आम्ही मागणी केली. पण मोदी सरकार त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. केंद्रामुळे देशात विजेचे गंभीर संकट निर्माण झाल्याचे सांगत मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावून बैठक घेतली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देश अंधारात बुडण्याचा धोका निर्माण झाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Leave a Comment