आग्रा : लव्ह जिहादला रोखण्यासाठी उत्तरप्रदेशमधील वैश्य समाजाने समाजातील शाळकरी मुलींच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरीभागातील व्यापारी वर्गाचा समावेश असलेल्या वैश्य समाजासारख्या सधन आणि सुशिक्षित समाजाने असे निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वैश्य समाजाने लावले मोबाईल वापरण्यास निर्बंध
या समाजाची नुकतीच आग्रा येथे बैठक पार पडली. या वेळी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. मुस्लीम तरूणांकडून हिंदू तरूणींना प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येत आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू तरूणींना लक्ष्य करण्यात येत असल्याबद्दल समाजातील अनेक नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणात राज्य सरकार विशिष्ट समाजाला विशेष संरक्षण देत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. त्याचबरोबर लव्ह जिहादला बळी पडून नये, यासाठी विद्यार्थी आणि तरूणींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.