नवी दिल्ली – अॅपलचा भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सने रेकॉर्ड मोडला असून भारतीय बाजारपेठेत अॅपलचे टॅबलेट मायक्रोमॅक्सला टक्कर देवू न शकल्यामुळे टॅबलेट विक्रीत मायक्रोमॅक्सने अॅपलला मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसरे स्थान मिळवले आहे.
टॅबलेट विक्रीत मायक्रोमॅक्सने अॅपलला टाकले मागे
काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत भारतीय बाजार पेठेत मोबाईल विक्रित पहिले स्थान प्राप्त केले आहे. मायक्रोमॅक्सने यापाठोपाठ आता बाजारपेठेत टॅबलेट विक्रित अॅपलला धोबीपछाड केले आहे.
आईडीसी (इंटरनेशनल डेटा कार्पोरेशन) च्या अहवालानुसार मायक्रोमॅक्सने भारतीय बाजार पेठेत टॅबलेट सेगमेंटमध्ये १४ टक्के मार्केट शेयर मिळवत अॅपलला मागे टाकले आहे.