विजय माल्ल्या ‘दिवाळखोर’ घोषित

vijay-mallya
नवी दिल्ली : कर्जात बुडालेल्या किंगफिशर एअरलाईन्ससह विजय माल्ल्या यांना केंद्र सरकारच्या युनायटेड बँक ऑफ इंडियाने दिवाळखोर म्हणून घोषित केले असल्याची माहिती बँकेचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी दिली.

या दिवाळखोरांची माहिती बँकेने अर्थ मंत्रालय, सेबी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला कळविली आहे. माल्ल्यांसह किंगफिशर एअरलाईन्सचे संचालक रवि नेंडुगडी, अनिलकुमार गांगुली आणि सुभाष गुप्ते यांनाही दिवाळखोर म्हणून घोषित केल्यामुळे या संचालकांना आपले पद गमवावे लागणार आहे. त्याचबरोबर बँकेच्या खात्यातून किंगफिशर कंपनी व संचालकांना पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले असून याप्रकरणी वॉरंट काढण्यात आल्यास कंपनी व या संचालकांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment