लठ्ठ मुलांचा धूम्रपानाकडे ओढा

smoking
वॉशिंग्टन – सामान्य वजनाच्या मुलांपेक्षा जाड मुलांचा धूम्रपानाकडे अधिक कल असतो. लठ्ठ मुलांना धूम्रपानाचे अधिक आकर्षण असते, असे अमेरिकेतल्या एका पाहणीतून आढळून आले आहे. पौगंडावस्थेतील मुलांच्या एका पाहणीमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे. शरीराची जाडी आणि धूम्रपानाची प्रवृत्ती याच्या संंबंधाने करण्यात आलेल्या या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

डॉ. एच. इसाबेला लांझा यांनी हे संशोधन केले आहे. तरुण मुलांचा सिगारेट ओढण्याकडे जास्त कल का आहे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी हे संशोधन आणि पाहणी केली होती. मुलांचा धूम्रपानाकडे अनेक कारणांमुळे कल असतो हे तर त्यांना आढळलेच. पण लठ्ठ मुले धूम्रपान करण्यास लवकर प्रवृत्त होतात असेही त्यांना दिसून आले.

आपण लठ्ठ असल्यामुळे इतरांपेक्षा वेगळे दिसतो हे त्यांच्या लक्षात येत असते आणि आपण सर्वांच्या सारखेच आहोत असे दिसावे अशी आतून त्यांना ओढ असते. या ओढीतूनच ते सिगारेट ओढायला लागतात असे एक सूक्ष्म मानसशास्त्रीय कारण या प्रवृत्तीमागे आहे असे इसाबेला लांझा यांनी म्हटले आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ हेल्थ बिहेविअर या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment