भाजप नेत्यांचे वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याचे संकेत

bjp1
मुंबई – प्रथमच महायुतीत जबरदस्त असा तणाव निर्माण झाला असून हा तणाव जागावाटपावरून झाला आहे. १४४ जागा भाजपला हव्या आहेत. मात्र, सेनेने नकार दिल्याने जे काही होईल ते होऊ द्या असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने दिल्याचे कळते. त्यामुळे महायुती फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाजप-शिवसेनेची युती अभेद्य राहील असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत प्रदेश भाजपच्या संसदीय बोर्डाची याच दरम्यान, स्वतंत्र लढायचे का याची चाचपणी करण्यासाठी बैठक सुरु झाली असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. याचबरोबर या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी, निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी हजेरी लावली आहे.

येत्या ४ सप्टेंबरला (बुधवारी) भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबई दौ-यावर येत असून यावेळी जागावाटपाबाबत निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याआधीच भाजपचे शिवसेनेवर दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment